जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 02:59 PM2019-10-31T14:59:56+5:302019-10-31T15:00:08+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतीत आहे.

 Heavy rains in Jalgaon Neur area | जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस

जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस

googlenewsNext

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतीत आहे. शेवगे, सातारे, एरंडगाव, पिंपळगाव लेप, जऊळके परिसरात बुधवारी (दि.३०) विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सतत पंधरा दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यात प्रामुख्याने मका, सोयाबीन, पोळ कांदा ही नगदी पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर कापणी केलेल्या मका, सोयाबीनला कोंब येऊन चारा पूर्ण सडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली. पश्चिम भागातील जळगाव नेऊर, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, पुरणगाव, नेऊरगाव, एरंडगाव भागात मोठ्या प्रमाणावर मका, कांदा, सोयाबीन, कपाशी पिके परतीच्या पावसाने खराब झाली आहेत. यावर्षी चांगले पिकांचे उत्पादन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती; पण या सर्वांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. या पिकांसाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला असून, शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पिकांचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title:  Heavy rains in Jalgaon Neur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक