मालेगावी पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:19+5:302021-06-29T04:11:19+5:30
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण व काही वेळेला हलक्या स्वरूपाच्या सरी ...
शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण व काही वेळेला हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. यामुळे यंदा मान्सूनने पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. अखेर ढगाळ वातावरणामुळे दुपारी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाची कोसळधार मोठ्या प्रमाणावर झाली. अर्ध्या-एक तासात शहर जलमय झाले. अनेक रस्त्यांवर पाणी खळाळून निघाले तर मोठ्या मोकळ्या भूखंडावर पाणी साचले. विजेचा कडकडाट सुरू होता तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. येथील मुख्य कँप रस्त्यावरील जुने चिंचेचे झाड आडवे झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सकाळी उशिरापर्यंत झाड हलविण्यात आले. या पावसामुळे पूर्व भागातील पवार वाडी, आझाद नगरसह वस्ती व झोपडपट्टी भागात कमरेएवढे पाणी साचले तर घरांमध्ये पाणी शिरले. हीच परिस्थिती पश्चिमेला कलेक्टर पट्टा, सोयगावसह काही भागात झाली होती. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विजेच्या कडकडाटाने अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली.
-------------------------
मालेगावी जोरदार पावसाने कँप रस्त्यावर कोसळलेले चिंचेचे झाड हटवताना कर्मचारी. (२८ मालेगाव रेन)
===Photopath===
280621\28nsk_21_28062021_13.jpg
===Caption===
२८ मालेगाव रेन