नांदूरशिंगोटे परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:15 PM2020-07-02T21:15:29+5:302020-07-02T22:52:34+5:30
नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे.
नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे.
सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. आर्द्रा नक्षत्र सुरू झाल्यापासून परिसरातील गावांमध्ये दिवसाआड पावसाने हजेरी लावली आहे. मृग नक्षत्रात परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची लागवड व पेरणी केली होती. मधल्या काळात पावसाने दडी मारली होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांची धावपळ उडाली. सुमारे एक ते दीड तास पाऊस सुरू होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या पाण्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटे-मोठे बंधारे व केटीवेअर भरले आहेत. तसेच काही भागात शेतात पाणी साचल्याने रोपांचे नुकसान झाले आहे. यावर्षी परिसरातील शेतकºयांनी खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी, मका या पिकांना पसंती दिली आहे.नांदूरशिंगोटे परिसरातील दोडी, दापूर, चापडगाव, मानोरी, कणकोरी, निºहाळे, भोजापूर खोरे परिसर, माळवाडी, गोंदे आदी भागात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी जूनच्या मध्यवर्ती व जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.