पांडाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 08:29 PM2019-09-04T20:29:43+5:302019-09-04T20:29:56+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे टमाटा, नागली, वरी पिकाला जीवदान मिळाले आहे. अहिवंतवाडी, अंबानेर, सागपाडा, माळे दुमाला, पुणेगाव, पिंपरी अंचला, कोल्हेर, पवारणीचापाडा परीसरात बुधवारी (दि.४) दुपारी ३ वाजेपासून परतीच्या पावसाला जोरदार सुरवात झाली आहे, त्यामुळे टमाटा, नागली, वरी, भुईमुग पिकाला जिवदान मिळाले आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे टमाटा, नागली, वरी पिकाला जीवदान मिळाले आहे.
अहिवंतवाडी, अंबानेर, सागपाडा, माळे दुमाला, पुणेगाव, पिंपरी अंचला, कोल्हेर, पवारणीचापाडा परीसरात बुधवारी (दि.४) दुपारी ३ वाजेपासून परतीच्या पावसाला जोरदार सुरवात झाली आहे, त्यामुळे टमाटा, नागली, वरी, भुईमुग पिकाला जिवदान मिळाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी परिसरात नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर टमाटा पिकाची लागवड केली जाते. या वर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या टमाट्याची रोप वाया गेला. त्यानंतर शेतकºयाला नर्सरीतून तयार रोपे विकत घेवून टमाटा लागवड करावी लागली आहे. टमाटा लागवडीनंतर परिसरात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे लावलेल्या पिकाची मर जास्त प्रमाणावर होत होती. परंतु बुधवारी झालेल्या पावसामुळे नविन लावलेला टमाटा पिकाची मर होणार नसल्याचे बळीराजा सांगत आहेत.