दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 08:57 PM2020-07-24T20:57:22+5:302020-07-25T01:06:06+5:30

येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, मूग, कांद्याची रोपे पावसाअभावी सुकू लागली होती. गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता.

Heavy rains save kharif crops | दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

Next

येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले
आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, मूग, कांद्याची रोपे पावसाअभावी सुकू लागली होती. गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे तासभर परिसरातील सर्वच गावांमध्ये जोरदार हजेरी लावली. पावसामुळे खडकी नाल्यास पूर आला असून, गावालगतच्या शेतातून वाहणाऱ्या पाण्यामुळे गोई नदीवरील शिवकालीन साठवण बंधारा भरला आहे. दरम्यान, नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शेतातील वाहणाºया पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सातत्याने पावसाळ्यात उद्भवणाºया या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षच असल्याने वाहनधारकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
-----------------
टमाटा, मका, सोयाबीन पिकांत साचले पाणी
मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात गुरु वारी (दि. २३) रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने वाढत्या उष्णतेमुळे मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. या मुसळधार पावसाने रस्त्याच्या कडेच्या नाल्या पाण्याने वाहू लागल्या होत्या. गावाजवळ असलेला नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असताना नाल्यालगत असलेल्या शेतकºयांच्या शेतात पाणीच पाणी वाहताना दिसत होते.

मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात गुरु वारी (दि. २३) रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने वाढत्या उष्णतेमुळे मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. या मुसळधार पावसाने रस्त्याच्या कडेच्या नाल्या पाण्याने वाहू लागल्या होत्या. गावाजवळ असलेला नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असताना नाल्यालगत असलेल्या शेतकºयांच्या शेतात पाणीच पाणी वाहताना दिसत होते.
शेतातील मका, सोयाबीन, टमाटा पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्याने अनेक शेतकºयांनी कांदा विक्र ीसाठी काढला आहे. त्यासाठी खोललेल्या कांदा चाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झाकण्यासाठी शेतकºयांची मोठी तारांबळ उडाली तर काहींचा कांदाही या पावसाने भिजला.
निºहाळे-फत्तेपूर परिसरातील बंधारे फूल्ल
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे गुरुवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली. निमोण, कºहे भागातील बंधाºयातून आलेल्या पाण्याने परिसरातील सर्व बंधारे ओव्हर फ्लो झाले. गुरुवारी रात्रभर हत्ती नक्षत्राचा पाऊस पडत होता. निमोण, कºहे येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने येथील जुने बंधारे ओव्हर फ्लो होऊन फुटले. ते पाणी सिन्नर तालुक्यात वाहून आले.
\पहाटे पहाटे लोंढा नदीला पूर आला. पूरपाण्याच्या आवाजाने काठावरील ग्रामस्थ जागे झाले. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून रिकामे असणारे बंधारे तासाभरात फुल्ल होऊन माळवाडी बंधाºयात पाणी पोहोचले. यावर्षी जूनच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, बाजरीसह भाजीपाला व ऊस लागवड केली. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती़
मात्र गत दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. गुरुवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शिवार ओलेचिंब होऊन शेतात पाणीच पाणी झाले आहे. नदी, नाले वाहू लागले आहे. शेततळे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी झालेल्या पावसापेक्षा यावर्षी प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
मेशीत पाऊस
मेशी : गेल्या दहा दिवसांपासून मेशीसह परिसरात दडी मारून बसलेल्या पावसाने दुपारी तीनं वाजेच्या सुमारास हजेरी लावत खरीप हंगामातील पिकांना जीवदान दिल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. या वर्षी अगदी जूनच्या आरंभापासूनच पावसाने जोरदार आगमन केले असल्याने खरिपाची पेरणी लवकर आटोपली होती. चांगला पाऊस होत असल्याने पिकेही जोमदार आहेत. पिकांची कुळवणी,निंदणीही आटोपली होती, मात्र गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. म्हणून शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. शुक्र वारी पहाटे चांगला पाऊस झाला़
मालेगावी जोरदार पावसामुळे परिसराला तलावाचे स्वरूप
मालेगाव : येथील विठ्ठलनगर, मित्रनगर, पुंडलिक नगर, विष्णूनगर, तुळजाई कॉलनी, दौलत नगर, स्वप्नपूर्ती नगर, पार्श्वनाथ नगर आदी भागात गटारी व पावसाच्या पाण्याच्या निचºयाची सोय नसल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली .यामुळे मनपा प्रशासनविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
सोयगावातील मित्रनगर, पुंडलिक नगर, विठ्ठल नगर, पवन नगर, पार्श्वनाथनगर, विष्णूंनगर आदी भागात गेल्या महीन्याभरापासून पावसाचे पाणी साचले आहे.त्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने पुन्हा तलावाचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. हे पाणी निघण्यास जागाच नाही.

Web Title: Heavy rains save kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक