दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:51 PM2020-07-04T22:51:44+5:302020-07-04T23:11:31+5:30

मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Heavy rains soothed the farmers | दमदार पावसाने शेतकरी सुखावला

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

Next
ठळक मुद्देमानोरी परिसर । खरीप हंगामातील मका, सोयाबीन, टमाटा पिकांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरी : मानोरी बुद्रुक परिसरात शुक्रवारी, दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर खरीप हंगामातील मका, सोयाबीन तसेच टमाटा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन पेरणीसाठी मोठी धडपड केली तर पेरण्या झाल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने सर्वत्र दडी मारल्याने परिसरातील पिके धोक्यात आली होती. मात्र, आताच्या पावसाने खाद्य टाकणे, खुरपणी, निंदणी, कोळपणी आदी कामांना आता वेग येणार असून, बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मका लष्करी अळीच्या विळख्यात अडकल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी मक्यावर औषध फवारणी करत आहेत. टमाटा लागवडीनंतर पाऊस गायब झाल्याने टमट्याची रोपे करपण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र पाऊस आल्याने टमाटा पिकाची लागवड पुन्हा तरारली असून, रोपे हिरवीगार झाली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन उगवली नसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ बळीराजावर आली असून, काही ठिकाणी सोयाबीन तुरळक उगवल्याने हजारो रु पयांचा खर्च पाण्यात गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नांदगाव तालुक्यात जोरदार पाऊसनांदगाव : तालुक्यात चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पेरणीनंतर दुसºया व तिसºया आठवड्यात असलेली पिके जोमदार असून, काही ठिकाणी कोळपणी झाली आहे. शेतात पाणी साचले असून, नाले व छोट्या बंधाºयात पाणी आले आहे. श्री क्षेत्र नस्तनपूर मंदिर परिसरात मंदिराच्या मुख्य गाभारºयात पावसाचे पाणी जमले. पिंपरखेड, न्यायडोंगरी नस्तनपूर आदी भागातले ओहोळ नाले तुडुंब भरून वाहिले. हातगाव दोनचा ८० दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघुबंधारा भरण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरींनी कमीअधिक फरकाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग आनंदी झाला आहे. सहा ठिकाणी सहा मंडळात असलेल्या पर्जन्यमापन यंत्रात बुधवारी रात्री दोन तासात झालेल्या पावसाची सरासरी १७ मिमी अशी नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद नांदगाव शहरातील पर्जन्यमापन यंत्रात ४४ मिमी असून, मनमाडला ३६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. मनमाड व नांदगाव येथे चांगला पाऊस झाला असला तरी भौगालिक दृष्ट्या सरळरेषेतील अंतरावर असणाºया हिसवळ येथील पर्जन्यमापन यंत्रात फक्त एक मिली एवढीच पावसाची नोंद दर्शविण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार जातेगाव वेहेळगाव या महसुली मंडळात झाला असून, नस्तनपूर-न्यायडोंगरी-सावरगाव या महसुली सजेत असणाºया गावांची नोंद करणाºया जातेगावच्या पर्जन्यमापन यंत्रात अवघ्या तीन मिमीची तर वेहेळगावला ती पाच मिमी अशी नोंद झाली.

Web Title: Heavy rains soothed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.