वटार परिसरात पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:04 PM2020-09-14T23:04:04+5:302020-09-15T01:28:23+5:30
सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
बळीराजा संकटात : मका पीक भुईसपाट; पंचनामे करण्याची मागणी
सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्यातील कापणी आलेला मका पूर्ण भुईसपाट झाल्याने पन्नास टक्के उत्पन्न घटणार असून जर पाऊस थांबला नाही तर कणसातून कोंब उगवून शकतात व कडबा पूर्ण खराब होणार आहे. डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी पडल्यान्याने बळीराजापुढे मोठ संकट उभ राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वाच खराब होणार असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. शेतकरी बाजरी कापणीच्या कामात व्यस्त दिसत होते पण अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वार्यासह आलेल्या पावसाने शेतकर्यांचे कंबरच मोडले.लावणी योग्य आलेले पावसाळी कांदा उळे, शेतात पडलेल्या बाजरीचे कणसे, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेली चार मिहने शेतात राबराबून तयार केलेलं पिके अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. परिरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून भाजीपाला पिकाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाल आहे.
फोटो :
पावसाने वटार परिसरात मका पिकाचे झालेले नुकसान.