दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

By admin | Published: September 19, 2015 11:07 PM2015-09-19T23:07:07+5:302015-09-19T23:08:18+5:30

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

Heavy showers decreased 36 tankers | दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

Next

नाशिक : शुक्रवारी दिवसभर बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई झपाट्याने कमी होत असून, एकाच दिवसाच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ३६ पाणी टॅँकर तत्काळ बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारनंतर पुन्हा पुनर्पाहणी करून टॅँकर बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रामुख्याने दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजल्या जाणाऱ्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील गावांवरील पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. सिन्नर तालुक्यात शंभरहून गाव-वाड्यांना २९ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
शुक्रवारच्या दमदार पावसानंतर २९ पैकी १४ खासगी पाणीपुरवठा करणारे टॅँकर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ १५ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
येवल्यातही यावर्षी पाणीटंचाईची परिस्थिती बिकट होती. मात्र शुक्रवारच्या दमदार पावसामुळे तिही कमी झाली आहे. येवल्यात २० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात १६ टॅँकरने पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असून, चार टॅँकरने तूर्तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही सोमवारी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत पुनर्पाहणी करून हे टॅँकरही बंद करायचे की सुरू ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
नांदगावला नऊ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यातील एक टॅँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. चांदवड तालुक्यात सात टँकरने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात पाच टॅँकर बंद करण्यात येऊन दोन टॅँकरच आता पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू ठेवले आहे. अन्य तालुक्यांतूनही पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या घटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Heavy showers decreased 36 tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.