अवजड वाहनांची वाहतूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:13+5:302021-01-08T04:42:13+5:30
सर्व्हिस रोडची साइडपट्टी उखडली नााशिक: महामार्गावरील हॉटेल जत्रा ते आडगावपर्यंतच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्याची साइडपट्टी उखडली ...
सर्व्हिस रोडची साइडपट्टी उखडली
नााशिक: महामार्गावरील हॉटेल जत्रा ते आडगावपर्यंतच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्याची साइडपट्टी उखडली असल्याने, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाचे काम सुरू असल्याने सध्या सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू आहे.
जूने नाशिकमध्ये मास्क दुर्लक्षित
नाशिक : जुने नाशिक या दाट लोकवस्तीच्या परिरसरात मास्क वापराकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असल्याने, फिजिकल डिस्टन्स नियमाचे कुठेही पालन होताना दिसत नाहीच. मास्क वापरणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
बस स्थानकात नियमांचे उल्लंघन
नाशिक: एस.टी. महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आलेली असली, तरी महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची वाहतूक होताना दिसत नाही. बसमध्ये, स्थानकावर, तसेच बचमध्ये चढताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. बसेस सॅनिटाइझ केले जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कुठेही बसेसची स्वच्छता होताना दिसत नाही.
रात्रीच्या रिक्षाचालकांची व्हावी तपासणी
नाशिक : ठक्कर बझार समोर असलेल्या रिक्षा स्टॅन्डवरील रिक्षाचालकांनी तपासणी व्हावी, अशी मागणी एका प्रवाशाने केली आहे. रात्रीच्या वेळी टवाळगिरी, आरआओरड करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षात बसणेही धोक्याचे वाटते, परंतु अन्य साधने नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने रिक्षात बसावे लागते.
बिटको रुग्णालय रोडवर धोकादायक वळण
नाशिकरोड : येथील नवीन बिटको रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग नसल्याने रुग्णालयातून परतणारे अनेक लोक हे विरुद्ध दिशेने वाहने आणत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होताे. यातून अपघाताची भीती व्यक्त होत आहे. अनेकदा रुग्णांना घेऊनही वाहने विरुद्ध दिशेने येत असतात. त्यामुळे रुग्णालयासमोर धोका वाढला आहे.
पुलांवर वाढला कचरा
तपोवन : तपोवनातील पुलांवर असलेल्या निर्माल्य कलशात कचरा न टाकता, लोक पुलावरच कचरा टाकत आहेत. या ठिकाणी पुलांच्या दोन्ही बाजूला कचरा टाकला जात आहे. काही नागरिक तर घरातील कचराही या कलशभोवती टाकत असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
गायकवाड मळ्यात नेहमीच वाहतूककोंडी
नाशिकरोड : नाशिकरोड येथील रेजिमेंटर प्लाझाकडून जाणाऱ्या गायकवाड मळा रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. दिवाळीमुळे तर या मार्गावरील गर्दी वाढली असल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे. रस्त्यावर उभी राहणारी वाहने, तसेच मालवाहू छोट्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.