कॉलनी रोडमधून अवजड वाहनांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 10:18 PM2020-01-28T22:18:45+5:302020-01-28T22:23:30+5:30
देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी संदीप भोळे यांना देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी संदीप भोळे यांना देण्यात आले आहे.
देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र . १६ मध्ये. ३५ वर्षांपूर्वी स्व. रामराव पुंजाजी आहेर यांनी पुढाकार घेऊन रामराव हौसिंग सोसायटी या शिक्षक कॉलनीची निर्मिती केली होती. सेवानिवृत्त शिक्षक येथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.
वाजगाव व कळवण या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, देवळा शहराचा पश्चिम भाग, रामेश्वर, कनकापूर,कांचणे, मुलुखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा आदी गावातील शेतकरी आपला शेतमाल विक्र ीसाठी कळवण रस्त्यावर असलेल्या नवीन बाजार समिती आवारात घेऊन येतात. या कॉलनीपासून १०० मीटरवर असलेल्या देवळा शहराकडील मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने शेतकरी घेऊन जातात. यामुळे दिवसभर कॉलनी वसाहतीत ट्रॅक्टर, पिकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची वर्दळ सुरू असते. पहाटे ५ वाजेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभरात दीडशे ते दोनशे वाहने कॉलनी रस्त्याने ये-जा करतात. यामुळे कॉलनीतील शांतता भंग झाली आहे.
या वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. ही धूळ घरातील वस्तूंवर बसते. यामुळे महिलादेखील त्रस्त झाल्या आहेत. धूळ व ध्वनीप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. या कॉलनी रस्त्याने होणारी वाहनांची वाहतूक बंद करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
निवेदनावर दादाजी निकम, नामदेव सोनवणे, दोधू बच्छाव, पोपट पगार, दिपक पवार, उत्तम पगार, अरुण आहेर, विष्णू मोरे, किसन निकम, शशिकांत शिंदे, दादाजी आहेर, रामकृष्ण दशपुते आदींसह कॉलनीतील नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.कॉलनी रोडने जाणारी वाहने भरधाव जातात. अपघात होण्याच्या भीतीमुळे लहान मुलांचे घराबाहेर खेळणे बंद झाले आहे. वाहतूक बंद करण्याचा आम्ही अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु वाहनचालक जुमानत नाहीत. समजावण्याचा प्रयत्न केला तर दमदाटीची भाषा करतात. यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून कॉलनीतील वाहतूक बंद करावी.
- वैभव भामर, रहिवासीकॉलनीच्या दोन्ही बाजूला कळवण व वाजगाव रस्त्यावर ‘अवजड वाहनांना प्रवेशबंद’ असे फलक लवकरच लावण्यात येतील. तसेच या कॉलनीतील वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत देवळा पोलीस ठाण्याला पत्र देणार आहे.
-संदीप भोळे,
मुख्याधिकारी, देवळा