वडाळा गाव कलानगर चौक मार्गे अवजड वाहनांची वाहतूक काही बंद होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:54 PM2020-10-29T23:54:13+5:302020-10-30T01:20:59+5:30

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये जा बंद ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गा कडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुर्घटना होऊन जीवितहानी ची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

Heavy vehicles did not stop at Kalanagar Chowk in Wadala village | वडाळा गाव कलानगर चौक मार्गे अवजड वाहनांची वाहतूक काही बंद होईना

वडाळा गाव कलानगर चौक मार्गे अवजड वाहनांची वाहतूक काही बंद होईना

Next
ठळक मुद्दे निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर ,कंटेनर, टँकरची ,वाहतूक वडाळा गाव , कलानगर चौक,वडाळा पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे

इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये जा बंद ती अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गा कडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली असून त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे दुर्घटना होऊन जीवितहानी ची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून वडाळा नाका ते पाथर्डी गाव नागपूरच्या धर्तीवर दोन टप्प्यात रस्ता तयार करण्यात आला या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे या रस्त्यावर विनय नगर, इंदिरानगर, साईनाथ नगर, सार्थक नगर, कला नगर ,पांडव नगरी, शरयू नगर ,समर्थ नगर, सह विविध उपनगरे आहेत त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू तसेच या रस्त्या लगतच प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते परंतु या कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार न करता लोक वस्तीतून सुमारे चार महिन्यापासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर ,कंटेनर, टँकरची ,वाहतूक वडाळा गाव , कलानगर चौक,वडाळा पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे त्यामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे वडाळा पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणीचे
निवेदन पोलीस आयुक्त यांना देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
 परिसरात सुमारे 60 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम असल्याने सकाळी व सायंकाळी कलानगर चौक ते पाथर्डी गाव या वडाळा पाथर्डी रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात त्यामुळे मोठ्या ज्येष्ठ नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते
 
Web Title: Heavy vehicles did not stop at Kalanagar Chowk in Wadala village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.