त्र्यंबकेश्वर तालुक्यात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:01 PM2019-04-21T14:01:51+5:302019-04-21T14:02:00+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरु प धारण केले असून महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरु प धारण केले असून महिलांना पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. अनेक लोक स्थलांतर करीत आहे.विशेष म्हणजे सोमनाथ नगर, विनायक नगर व वेळे या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात या वर्षी भीषण पाणीटंचाई असुन उपाय योजना करणारे अधिकारी आता निवडणुक कामाला जुंपल्याने टंचाई प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामसेवक कुचराई करीत आहेत. विशेष म्हणजे प्रस्तावच न दिसल्याने तालुक्यात टंचाई परिस्थितीच नाही असे चित्र समोर दिसते. सध्या तालुक्यात सोमनाथ नगर, गणेशगावची वाडी, विनायक नगर व वेळे येथील प्रस्ताव दाखल झालेले असले तरी या गावांच्या उपाय योजना (टँकर वगैरे) अद्याप
सुरु करण्याबाबत निर्णय झालेला नाही. टंचाई प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रि या करण्यात कालापव्यय होत असतो. त्यामुळे नंतर टँकर जरी सुरु झाले तोर्यंत मे जुनचा पहिला पंधरवडा उलटतो. वाघेरा अंबोली वगैरे धरणामधुन किमान एक इंच पाईपलाईनटाकुन का होईना गणेशगाव व जवळील अन्य तहानलेल्या गावांना पाणी उपलब्ध करु न द्यावे अशी मागणी या लोकांनी केली आहे. कारण प्रस्ताव दाखल होउन ११ ते १२ दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्याप उपाययोजना झालेली नाही. अजुन टंचाईची व्हेरीफिकेशनची वगैरे प्रक्रि या सुरु झालेली नाही. अजुन तर तालुक्यातुन टंचाईचे अनेक प्रस्ताव दाखल व्हायचे आहेत.