ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 06:51 PM2019-02-05T18:51:05+5:302019-02-05T18:51:43+5:30
खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ...
खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी आता ग्रामीण भागातही दुचाकी चालकासाठी हेल्मेटचा वापर सक्तीचा केल्याने ग्रामीण भागातील मोटरसायकल मोठी धावपळ उडाली आहे.
ग्रामीण भागात एक फेब्रुवारी पासून मोटरसायकल चालकाला हेल्मेट सक्ती केल्याने मोटर सायकल चालकांकडे हेल्मेट नाही. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आता पोलिसांच्या धाकाने ग्रामीण भागात हेल्मेट खरेदी वाढली असून आता बऱ्याच प्रमाणात गावतील लोकांकडे हेल्मेट दिस ूलागले आहेत.
परंतु रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या आणि दररोजचे अपघात लक्षात घेता ग्रामीण भागातही हेल्मेट अभावी दुचाकीस्वारांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ संजय दराडे यांनी एक फेब्रुवारी पासून ग्रामीण भागातही दुचाकीचालकाला हेल्मेट वापर सक्तीचा केला आहे. आणि जे काही हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करतील त्या वाहनचालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी तालुक्याच्या शहरी भागात करण्यात येत आहे.
बिगर हेल्मेट चालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावातून प्रवास करण्यासाठी निघणारा मोटरसायकलस्वार डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात अगदी अल्प मोटरसायकलस्वाराकडे हेल्मेट आहेत. पण या दोन दिवसांपासून तालुक्याच्या शहरामघ्ये विना हेल्मेट मोटरसायकल चालकांवर कार्यवाही केली जात असल्याने ग्रामीण भागातील मोटरसायकलवाले हेल्मेट खरेदी करतांना दिसून येत आहेत. तर बºयाच प्रमाणात आता ग्रामीण भागात देखिल हेल्मेट आहे. ग्रामीण भागातील विशेष शेतकरी वर्गाला हेल्मेट वापरण्याची सवय नसल्याने त्याला डोक्यात हेल्मेट घातल्यावर डोके जड वाटते. मोटरसायकल चालविण्यास अडचण निर्माण होत आहे. काही लोक तर शहर जवळ आले की हेल्मेट वापर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर मोटरसायकल चालकाच्या मागे बसलेल्या माणसाच्या हातात हेल्मेट दिसत आहे.