हेल्मेट ड्राइव्ह; ३५० चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:07 AM2018-08-04T01:07:55+5:302018-08-04T01:09:26+5:30
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी (दि़ ३) वाहतूक पोलिसांनी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट ड्राइव्ह राबवून कारवाई केली़ यामध्ये हेल्मेट न वापरणाºया ३५० दुचाकीचालकांसह सुमारे ६०० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ या ड्राइव्हमध्ये तीन स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत दुचाकीचालकांची हेल्मेटबाबत जनजागृती केली़ सुमारे तीन तास राबविण्यात आलेल्या या ड्राइव्हमध्ये सुमारे सव्वादोन लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला़
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी (दि़ ३) वाहतूक पोलिसांनी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट ड्राइव्ह राबवून कारवाई केली़ यामध्ये हेल्मेट न वापरणाºया ३५० दुचाकीचालकांसह सुमारे ६०० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ या ड्राइव्हमध्ये तीन स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत दुचाकीचालकांची हेल्मेटबाबत जनजागृती केली़ सुमारे तीन तास राबविण्यात आलेल्या या ड्राइव्हमध्ये सुमारे सव्वादोन लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला़ दरम्यान, ही मोहीम सुरूच असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी दिली़
पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीची सुरुवात ही पोलिसांपासून केली होती, यानंतर शहरातील विविध शासकीय कार्यालयात पत्र पाठवून हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती केली होती़ मात्र, जनजागृती करूनही दुचाकीधारकांकडून हेल्मेटबाबत दुर्लक्ष केले जात होते़ शहरात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे वाहनधारकांची चांगलीच कोंडी झाली.
सायंकाळपर्यंत सहाशेपेक्षा अधिक कारवाई
पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी भेट देत होते़ तर यावेळी तीन सामाजिक संस्थांच्या वतीने दुचाकीचालकांचे प्रबोधन केले जात होते़ शुक्रवारी दिवसभर ३५० हून अधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून सरसकट ५०० रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी काही दुचाकीस्वारांनी पोलिसांना पाहून पर्यायी रस्त्यांचा अवलंब केला़; पोलीस दंडात्मक कारवाईवर ठाम असल्याने सायंकाळपर्यंत सहाशेहून अधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.