ग्रामीण भागातही आता हेल्मेट सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 07:02 PM2019-01-16T19:02:58+5:302019-01-16T19:04:46+5:30
विंचूर : मोठ्या शहरांमध्ये राबविलेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही राबविण्यात येणार आहे. एक फेब्रूवारीपासून जिल्हयात ग्रामीण भागात ...
विंचूर : मोठ्या शहरांमध्ये राबविलेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही राबविण्यात येणार आहे. एक फेब्रूवारीपासून जिल्हयात ग्रामीण भागात मोटार वाहन केसेस विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहन चालकाने सिट बेल्ट न लावणे, वाहनचालक परवाना न बाळगराऱ्यांवर पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे.
येत्या १ फेब्रुवारीपासून पोलिसांकडुन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. परिणामी आता नागरिकांना दुचाकी वाहन घेऊन घराबाहेर पडताना हेल्मेट, गाडीची कागदपत्रे आदि बरोबर घ्यावे लागणार आहे. या मोहीमेदरम्यान मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषकरु न मोटार सायकल स्वाराने हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनावरील चालकाने सिट बेल्ट न लावणे, वाहन चालक यांनी वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, वाहनाचा विमा न काढता वाहन चालविणे आदी मुद्यांवर विशेष लक्ष देऊन तपासणी करण्यात येणार आहे.
मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. या दृष्टीकोणातुन नागरिकांनी आवश्यक ती पुर्तता करुन घ्यावी, जेणेकरु न पोलीस विभागाकडुन होणाºया कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.
येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर तीनपाटी परिसरात महामार्गावर पोलिसांची अधुनमधुन तपासणी मोहीम सुरु असते. आता मात्र या विशेष मोहीमेमुळे नागरिकांना विंचूरहुन लासलगावला प्रवास करायचा असला तरी हेल्मेट घालावे लागणार आहे.
येत्या १ तारखेपासून हेल्मेट न घालणे, चारचाकी वाहनचालकाने सिट बेल्ट न लावणे, परवाना न बाळगणे अशा वाहनधारकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पुर्तता करु न घ्यावी.
- शिवचरण पांढरे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, लासलगाव.