अंदरसूल परिसरात पोलिसांतर्फे हेल्मेट जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:48 PM2019-02-02T17:48:18+5:302019-02-02T17:48:35+5:30
येवला : शहरासह ग्रामीण परिसरात हेल्मेट सिक्तची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने सुरु करण्यात आली
येवला : शहरासह ग्रामीण परिसरात हेल्मेट सिक्तची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने सुरु करण्यात आली असून येवला ग्रामीण पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस हवालदार वसंतराव हेंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंदरसूल बिट अंतर्गत गवंडगाव टोल नाक्यावर भाजपा नेते बाबा डमाळे, गवंडगाव सरपंच वेणुनाथ भागवत यांच्या हस्ते बिगर हेल्मेट मोटारसायल प्रवाशाला हेल्मेट देऊन जनजागृती करण्यात आली.
अंदरसूल बिटचे वाय. आर. पाटोळे, बी. जे. पारखे, बी. एम. पगारे यांनी आज गवंडगाव टोल नाक्यावर सदर कारवाई सुरु केली. या कारवाईमध्ये प्रथम दुचाकी वाहनचालकांना थांबवुन त्यांना हेल्मेट नसल्यामुळे अपघातात अनेकांचा मृत्यू कसा झाला, याची माहिती देण्यात आली. यावेळी बिगर हेल्मेटस्वरांकडून दंडही वसुली करण्यात आला. याप्रसंगी बिगर हेल्मेट दुचाकीचालक संतोष आहेर यांस डमाळे यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरु पात हेल्मेट देण्यात आले. तर काही हेल्मेटधारी दुचाकीस्वरांचे पोलिस कर्मचार्?यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागतही करण्यात आले. याप्रसंगी गवंडगाव टोलचे मॅनेजर डुबे, कचरु भागवत, बाळासाहेब भागवत, प्रवासी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.