भावली कोविड सेंटरला इनव्हर्टरसह बॅटऱ्यांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:10 PM2021-05-13T22:10:23+5:302021-05-14T00:58:11+5:30

इगतपुरी : कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली येथे कोविड सेंटर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे. तेथे कमतरता असलेल्या इनव्हर्टरसह ४ नवीन बॅटऱ्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी भेट दिल्या.

Help of batteries with inverter to Bhavli Kovid Center | भावली कोविड सेंटरला इनव्हर्टरसह बॅटऱ्यांची मदत

भावली कोविड सेंटरला इनव्हर्टरसह बॅटऱ्यांची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना

इगतपुरी : कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली येथे कोविड सेंटर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे. तेथे कमतरता असलेल्या इनव्हर्टरसह ४ नवीन बॅटऱ्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी भेट दिल्या.
या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब बोडके यांना समजली. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी गोरखभाऊ बोडके युवा फाउंडेशनच्या माध्यमातून या कोविड सेंटरला नवीन इनव्हर्टरसह ४ नवीन बॅटऱ्या दिल्या.

बॅटरी आणि इन्व्हर्टर देतेवेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, संजय खातळे, दत्ता पाटील, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, माणिकखांबचे माजी सरपंच हरीश्चंद्र चव्हाण, महेश शिरोळे, आरोग्य विस्तराधिकारी एस. बी. शेळके आदी उपस्थित होते.  

Web Title: Help of batteries with inverter to Bhavli Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.