अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात ,चेन्नईच्या ‘हेल्प द ब्लाईंड’ने दिली नाशिकच्या 38 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:31 PM2017-12-13T15:31:40+5:302017-12-13T15:38:39+5:30
हेल्प द ब्लाईंडने गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सुरू केली असून या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व विद्यार्थिनींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यास मदत होत आहे
नाशिक : शहरातील के टीएचएम महाविद्यालयाच्या अंध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चेन्नई येथील हेल्प द ब्लाईंड या संस्थेने आर्थिक मदतीचे पाठबळ उभे केले आहे. या संस्थेने केटीएचएम महाविद्यालातील 38 अंध विद्यार्थ्यांना शिष्टवृत्ती दिली असून एका विद्यार्थ्याला लॅपटॉपही देण्यात आला आहे. हेल्प द ब्लाईंडने गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सुरू केली असून या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व विद्यार्थिनींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.
चेन्नई येथील ह्यहेल्प द ब्लाईंडह्ण या संस्थेकडून केटीएचएम महाविद्यालयातील 38 अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.महाविद्यालयाच्या व्हीएलसी हॉलमध्ये मंगळवारी (दि.13) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंतीदीदी, विनादीदी, हेल्प द ब्लाईंड संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक व्ही. डी. सावकार, उपस्थित होते. यावेळी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हेल्प द ब्लाईंड संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून पाठबळ देते. या मदतीचे विद्यार्थ्यांनी मोल जाणले असून त्यातून शैक्षणिक प्रगती साधली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांनी यासंस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचे भान ठेऊन उच्च शिक्षण घेत विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामिगरी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर व्ही. डी. सावकार यांनी यावेळी हेल्प द ब्लाईंड संस्थेच्या विविध योजना व कामांची माहिती देऊन शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्याचे आवाहन केले. वासंतीदीदी यांनी शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक विकासाचाही ध्यास घ्यावा असे आवाहन करतानाच शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा व अध्यात्मातून मनाचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रफुल्ल भावसार, सागर जोरवर, आशा बेनके, सरस्वती काहीरे, गीता गवळी, संतोष नाठे, वैभव जगताप, अनिल पवार, प्रियंका जाधव, सोनू परदेशी, संगीता देवरे, सुमित जाधव, सुरज पाटील, राहुल धामणो, मयुरी साळवे, श्वेता तागडकर, राणी वाघेरे, कृष्णा पौल, जयश्री इंगळे, आश्रम गायकवाड, सुरेश भोईर, आरती कुलथे, अभिजित राऊत, भारती निकम, गायत्री सावळे, सारिका शिंदे, पंकज सावळे, सागर बोडके, सुमन बेनके, राहुल सोर, अश्विनी कहांडळ, प्रियंका घुमरे, अक्षय पाटील, वसंत चौधरी, आकाश चव्हाण, वेदांत मुंदडा, श्रीकृष्णा नाजगड व तारा उगळे या अंध विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संस्थेमार्फत आकाश चव्हाण या होतकरू अंध विद्याथ्र्यास लॅपटॉप भेट देण्यात आला.