दाभाडीसह अकरा गाव योजनेस तळवाडेतून पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:28 AM2017-07-21T00:28:22+5:302017-07-21T00:29:11+5:30
दाभाडीसह अकरा गाव योजनेस तळवाडेतून पाणी देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : पाणीपुरवठा आरक्षणास धक्का न लावता दाभाडीसह ११ गाव पाणीपुरवठा योजनेस ५० दलघफू पाणी आरक्षण शासनाने मंजूर केल्यास तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास यावे या विषयास मनपाच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर रशीद शेख होते.
मनपाच्या कर्मचारी, अधिकारी, कामगार यांना वैद्यकीय भत्ता २०० रूपयांवरुन ५०० देण्यास सभागृहाने मंजुरी दिली. यासह विविध १३ विषयांना मंजुरी देण्यात आली.
महाआघाडीचे गटनेते बुलंद एकबाल यांनी द्याने, रमजानपुरा, मालधे सारख्या हद्दवाढ परिसरातील झोपडपट्टीवासियांना पाणी देण्यात यावे. नंतर दाभाडी पाणीपुरवठासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी उपसूचना मांडली. डॉ. खालीद परवेझ यांनी पाणी आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर देण्यास विरोध नाही; परंतु गतवर्षी जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गिरणा धरणातून शहराचे पाणी आरक्षण कमी करुन जळगावला देण्यात आले होते. याची जाणीव करुन दिली. चर्चेअंती दाभाडीसह पाणी देण्यासाठी मतदान घेण्यात आले. यात २१ विरुद्ध ५१ अशा बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला.
डॉ. खालीद परवेझ यांनी अटल अमृत योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. मूळ नकाशाप्रमाणे कामे न करता त्यात फेरफार केल्याचा आरोप डॉ. खालीद यांनी केला. त्यावर मुख्य अभियंता जहीर अन्सारी यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भाजपाचे मदन गायकवाड यांनी ओपन
स्पेसवर पाण्याची टाकी बनवितात तेव्हा नियम कोठे जातात, असा प्रश्न केला.
त्यावर जहीर असा प्रश्न केला. त्यावर जहीर अन्सारी यांनी उच्च आवाजात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर महापौर शेख रशीद यांनी नगरसेवकांना दादागिरीने उत्तर देणार का? असे विचारत अन्सारी यांना शिस्तीत राहण्याचे आदेश दिले. तुमच्यामुळे शहराच्या गोरगरीबांना नळाचे पाणी मिळत नसल्याचा आरोप खुद्द महापौरांनी केला. तब्बल चार तास चाललेल्या आजच्या चर्चेत उपमहापौर सखाराम घोडके, निलेश आहेर, बुलंद एकबाल, शान-ए-हिंद, असलम अन्सारी यांनी भाग घेतला....तर मनपातर्फे तुमचा सत्कारपाणीपुरवठा अभियंता यांच्या आडमुठे धोरणामुळे शहराच्या गोरगरीब झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्यांना जलवाहिनीअभावी पिण्याचे पाणी मिळत नाही. तुम्ही निवृत्तीपर्यंत वेळकाढूपणा करीत असाल तर राजीनामा द्यावा. तुमचा मनपातर्फे सत्कार करण्यात येईल, असे खडे बोल महापौर शेख रशीद यांनी जहीर अन्सारी यांना सुनावले.