शहीद पोलीस कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:00 PM2020-06-17T23:00:17+5:302020-06-18T00:34:46+5:30
नाशिक : जिल्ह्यात मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलीसही बाधीत झाले. यात तीन पोलीस शहीद झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान व विमा रक्कमेचा प्रत्येकी ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. त्यात पोलिसांनाही बंदोबस्ताची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. नाशिक जिल्ह्यात सुरुवातीस मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलीसही बाधीत झाले. त्यापैकी तीन पोलीस शहीद झाले.
-------------------
कोरोना बंदोबस्तादरम्यान मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा विमा तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फेही १० लाख रुपयांचा सानुग्रह देण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलातील शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना धनादेश प्रदान करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.