अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:58 AM2017-10-26T00:58:36+5:302017-10-26T00:58:36+5:30
अजंग-दाभाडी रस्त्यावर ढवळीविहीर तलावात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातातील मृत महिला मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख, तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मालेगाव : अजंग-दाभाडी रस्त्यावर ढवळीविहीर तलावात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातातील मृत महिला मजुरांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख, तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. मंगळवारी (दि. २४) ट्रॅक्टर उलटून पाण्यात बुडाल्याने सात महिलांचा मृत्यू झाला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी आर्थिक मदतीची माहिती दिली. पालकमंत्री महाजन म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी आहे. चालकाच्या चुकीमुळे दुर्दैवी प्रसंग उद्भवला. चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मृतांच्या नातेवाइकांना व जखमींना अधिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अपघातातील मृतांवर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धाडसाचे कौतुक
बुडणाºया पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे हिच्या धाडसाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले. तिचा शासनाकडून गौरव करण्यात येईल, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.