चाळीस व्हेंटिलेटर्सची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:10+5:302021-05-26T04:15:10+5:30
तिसरी लाट प्रामुख्याने लहान मुलांना बाधित करेल, असे अंदाज बांधले जात आहेत. दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व ...
तिसरी लाट प्रामुख्याने लहान मुलांना बाधित करेल, असे अंदाज बांधले जात आहेत. दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये व मुलांच्या उपचारात कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाययोजना आतापासूनच राबवाव्यात. यासाठी प्रशासनाबरोबरच उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार कोकाटे यांनी केले होते. आमदार कोकाटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल व सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयास सिन्नर येथील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने प्रत्येकी २० व्हेंटिलेटर व २० बायपॅक दिले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.थोरात आदीसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
इन्फो
अवरनेस इन द पब्लिक
‘लोकमत १८’ने लोकांमध्ये लसीकरणबाबत जागृती घडवून आणण्यासाठी ‘अवरनेस इन द पब्लिक’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावेळी या मोहिमेचा शुभारंभ करताना लोकांच्या मनातील लसीबाबत असलेल्या शंका दूर करण्याचे व लस घेतल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती पोहोचविण्याची ही मोहीम स्तुत्य असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
फोटो - २५ सिन्नर व्हेंटिलेटर
सिन्नरच्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीकडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ४० व्हेंटिलेटर सुपुर्द केले. याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक व हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे अधिकारी.
===Photopath===
250521\25nsk_42_25052021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ सिन्नर व्हेंटीलेटर सिन्नरच्या हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीकडून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे ४० व्हेंटिलेटर सुपूर्द केले. याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक व हिंदुस्तान यूनिलिव्हर कंपनीचे अधिकारी.