मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:02 AM2018-02-28T02:02:10+5:302018-02-28T02:02:10+5:30

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला,

Help hand: Maratha Kranti Morcha youth to accept Nandini's liability | मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक

मदतीचा हात : आईच्या मारहाणीने गंभीर स्थितीत उपचार नंदिनीचे दायित्व स्वीकारणार मराठा क्रांती मोर्चाचे युवक

Next
ठळक मुद्देतिचे भवितव्य अधांतरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आईने प्रियकराच्या संगनमताने सुटीवर आलेल्या आपल्या दोन मुलांना जबर मारहाण करून एकाचा बळी घेतला, तर दुसºया मुलीला जबर जखमी केले आहे. त्यातील बालकाचा अंत झाला, परंतु मुलगी बचावली. दहा वर्षांच्या नंदिनीवर उपचार सुरू आहे. परंतु तिचे भवितव्य अधांतरी आहे. याची दखल घेत मराठी क्रांती मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांना ही घटना कळताच त्यांनी नंदिनीची भेट घेऊन आधार तर दिलाच शिवाय तिचे दायित्वही स्वीकारले. शरणपूर गावठाण भागातील मिशन मळा भागात भाडेतत्त्वावर राहणाºया सोनाली ऊर्फ सोनूबाई या विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिचा सहा वर्षीय मुलगा नकुल थोरात याला धोपटणीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली तर दहा वर्षांची मुलगी नंदिनीही जखमी असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार कळताच मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांची भेट घेऊन मुलगी नंदिनीच्या जखमा, उपचार औषधे यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आणि मुलगी नंदिनीच्या उपचारासाठी काही कमी पडता कामा नये. पडल्यास मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक लागेल ती मदत करतील, असे स्पष्ट केले. नंतर मुलगी नंदिनी ज्या वार्डला उपचारासाठी दाखल आहे त्याठिकाणी जाऊन नंदिनीची भेट दिली व तिलाही आधार दिला. त्याठिकाणी नंदिनीची मावशी उपस्थित होती. तिला आधार देत सर्व मदत आम्ही करू, असे सांगितले. नंदिनीच्या मावशीच्या कुटुंबीयांची स्थिती यथातथाच असून त्यामुळे आई तुरुंगात गेल्याने नंदिनीला कोण सांभाळेल, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र त्यावेळी समन्वयक यांनी मावशीला आधार देत सांगितले की, मुलगी नंदिनी बरी झाल्यानंतर तिची सर्व व्यवस्था ही आम्ही करून देतो, तिचे शिक्षण असो, तिचे हॉस्टेल असो, तिला जे लागेल ते सर्व आम्ही उपलब्ध करून देऊ ही जबाबदारी आम्ही स्वीकारलीआहे, असे सांगण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक तुषार जगताप, सचिन पवार, किरण पाणकर, योगेश कापसे, शरद लभडे, दीपक दहिकर, सुरेश सोळंकी, नीलेश गायके, सागर पवार, करण टिळे, रवींद्र बोचरे, गौरव शितोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Help hand: Maratha Kranti Morcha youth to accept Nandini's liability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.