आरोग्य कर्मचारी संघटनेकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:17 AM2019-01-23T00:17:07+5:302019-01-23T00:17:24+5:30
जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.
नाशिक : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.
जिल्हा परिषद सभागृह अहिरे कुटुंबीयांना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, महिला बाल कल्याण सभापती अर्पणा खोसकर, भारतीय कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकार गिते यांनी संघटनेच्या या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. संघटनेचे राज्य समन्वयक बाळासाहेब ठाकरे, राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे, जिल्हाध्यक्ष विजय सोपे, विभागीय कार्याध्यक्ष विलास पगार, कार्यकारी अध्यक्ष एकनाथ वाणी, सचिव सुभाष कंकरेज, सरचिटणीस अशोक पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.