उपचारांसाठी कामगार शक्ती फाउंडेशनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:52+5:302021-07-01T04:11:52+5:30
------------------------------ शहा येथे ‘प्रहार’चे ठिय्या आंदोलन सिन्नर : शहा येथे दिव्यांग पंकज पेटारे यांनी तलाठ्यास सातबारा उतारा मागितला. तथापि, ...
------------------------------
शहा येथे ‘प्रहार’चे ठिय्या आंदोलन
सिन्नर : शहा येथे दिव्यांग पंकज पेटारे यांनी तलाठ्यास सातबारा उतारा मागितला. तथापि, तलाठ्याकडून अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी तलाठ्याने दिव्यांग पेटारे यांची माफी मागावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. माफी न मागितल्यास रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येणार असल्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
--------------------------
‘शिवशंभो समिती’ तालुकाध्यक्षपदी शिंदे
सिन्नर : शिवशंभो पालखी सोहळा समितीच्या तालुकाध्यक्षपदी मुसळगाव येथील आकाश शिंदे यांची निवड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास लहान मुलांच्या व तरुण पिढीच्या मनात रुजावा या उदात्त हेतूने वढू, आळंदी ते श्रीक्षेत्र रायगड पालखी सोहळा समिती आयोजित शिवशंभो स्वराज्य ऐतिहासिक लेखा परीक्षा २०२१ आयोजित करण्यात आलेली आहे. शिवशंभो परीक्षेसाठी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------
अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा
सिन्नर: संपूर्ण जून महिना संपत आला तरी सिन्नर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शनिवार आणि रविवारी काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी शेतकऱ्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
-------------------
रुग्णाला दिली आर्थिक मदत
सिन्नर: रात्रीच्या वेळी वडगाव-सिन्नर येथे घरी जाताना पाय घसरुन गुडघ्याचे हाड मोडलेल्या कैलास माळी या तरुणाच्या उपचारांचा खर्च उचलत डॉ. धनराज सोनार राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे व राजेंद्र चव्हाणके यांनी आधार दिला. माळी यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नव्हते. मात्र डॉ. सोनार यांनी खर्चात सूट दिली. त्याचबरोबर चव्हाणके, मुरकुटे यांनी मदत दिली आहे.