‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:36 AM2017-08-10T00:36:00+5:302017-08-10T00:36:57+5:30
नाशिक : एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबास ५० व २५ हजारांची मदत शासनाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.
नाशिक : एक अथवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबास ५० व २५ हजारांची मदत शासनाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री योजने’तून मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी दिली.
बुधवारी (दि.९) महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती अर्पणा खोसकर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. सदस्य गणेश अहिरे यांनी अंगणवाडी केंद्रात बालक, किशोरवयीन मुली, मातांना कोणकोणता आहार दिला जातो, याची माहिती अंगणवाडी सेविका देत नाही. जिल्हास्तरावरून हा आहार पुरवठा केला जात असल्याने स्थानिक पातळीवर योग्य नियोजन होत नसल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी आहारासंदर्भात कोणतीही तक्रार आल्यास त्याची बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी दखल घ्यावी व जिल्हा परिषद सदस्यांनी माहिती विचारल्यास तत्काळ द्यावी, अशी सूचना केली. पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी केंद्रास समक्ष भेटी देऊन सखोल तपासणी करावी. अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना वेळेवर नियमित आहार देण्याबाबतच्या कडक सूचना सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना १ आॅगस्ट २०१७ पासून लागू झालेली आहे. तिची माहिती विभागाच्या अधिकाºयांनी दिली. या योजनेचा व्यापक प्रचार व प्रसार होण्यासाठी योजनेची माहिती अंगणवाडी केंद्रांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या. एका मुलीनंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार रुपये
बॅँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
बैठकीस गणेश अहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कला अहेर, सुनीता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे आदी उपस्थित होते. १८ व्या वर्षी व्याज काढता येईलमुलीच्या वयाच्या ६, १२ व १८ व्या वर्षी अनुज्ञेय व्याज काढता येईल. दोन मुलींनंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्या व दुसºया मुलीच्या नावे प्रत्येकी रुपये २५ हजार याप्रमाणे ५० हजार रुपये इतकी रक्कम बॅँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल. माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ १ आॅगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या जन्मलेल्या मुलींना अनुज्ञेय राहील, असे स्पष्ट करण्यात आले.