सायखेडा शिवारातील मेंढपाळांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:54 PM2020-04-22T17:54:36+5:302020-04-22T17:55:13+5:30
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांच्या हस्ते किराणा आणि धान्याचे शेतात जाऊन वाटप करण्यात आले.
सायखेडा : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांच्या हस्ते किराणा आणि धान्याचे शेतात जाऊन वाटप करण्यात आले.
कोरोना रोगाच्या प्रसारामुळे अनेक गावे, शहरे बंद आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावर झाला असून त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा, धान्य, किराणा अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर, छोटे व्यावसायिक, सलून दुकानदार यांच्या दैनंदिन जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे गावागावात आणि शेतात राहणाऱ्या मेंढपाळांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. संचारबंदी कायदा लागू असल्यामुळे अनेक ठिकाणच्या बाजारपेठा पूर्णत: बंद आहेत. ते मेंढ्या विकू शकत नसल्यामुळे दररोज लागणारा किराणा आणि धान्य कसे उपलब्ध करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन हवालदिल झालेल्या मेंढपाळांना त्यांनी ज्या शेतात राहोटी दिली आहे तेथे जाऊन पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने किराणा व धान्याचे वाटप केले. याप्रसंगी निवृत्ती मराळे, संतोष पाल्हाळ, अण्णा ढेपले, अनिल मराळे, रमेश ढेपले यासह मेंढपाळ उपस्थित होते.