पुरग्रस्तांना तातडीने मदत करा, महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 06:46 PM2019-08-05T18:46:33+5:302019-08-05T18:48:33+5:30

नाशिक - रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पुरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काही ठिंकाणी पथदिप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणी देखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Help the sufferers quickly, the mayor directs | पुरग्रस्तांना तातडीने मदत करा, महापौरांचे निर्देश

पुरग्रस्तांना तातडीने मदत करा, महापौरांचे निर्देश

ठळक मुद्देमहापालिकेत आढावा बैठकआयुक्तांनी केली पाहणी

नाशिक - रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पुरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. काही ठिंकाणी पथदिप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणी देखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

रविवारी (दि.४) शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूर धरणातून सुमारे ४४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेला भाग पाण्याखाली गेला. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी यासह अन्य नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने संपर्क खंडीत झाला होता. सोमवारी (दि.५) पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पुरस्थिती देखील कमी झाली. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली.

शहरात ज्या ठिकाणी चिखल गाळ साचला आहे तो तातडीने काढण्यात यावा. तसेच त्यानंतर तत्काळ त्याठिकाणी डास निर्मुलन औषधांची फवारणी करावी, अनेक पथदिप वेडे वाकडे झाले असून त्याचा प्रवाह घरादारात शिरून दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पथदिप दुरूस्त करावेत, ज्याठिकाणी जलववाहिन्या फुटल्या आहेत, त्या पूर्ववत कराव्यात अशाप्रकारच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या.

यावेळी बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते तसेच स्थायी समिती सभापती उध्दव निमसे सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार, रिपाईच्या गटनेत्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Help the sufferers quickly, the mayor directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.