पीड़ित कुटुंबाला संसारउपयोगी वस्तुंची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:46 PM2018-12-01T17:46:13+5:302018-12-01T17:46:26+5:30
राजापूर : येथील अलगट वस्तीजवळील सोनतळा येथे मागील महिन्यात जळीत झाल्याने नामदेव भोरू ठाकरे यांच्या घराचे व घरातील संसारपयोगी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
राजापूर : येथील अलगट वस्तीजवळील सोनतळा येथे मागील महिन्यात जळीत झाल्याने नामदेव भोरू ठाकरे यांच्या घराचे व घरातील संसारपयोगी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या जळीत कुटुंबाला नारायणगिरी महाराज फाउंडेशन व येवला प.स.उपसभापती रु पचंद रामचंद्र भागवत यांच्या वतीने पीड़ितांना संसारउपयोगी वस्तूची मदत करण्यात आली. ठाकरे यांचे कुटुंब हे मोल मजूरी करतात घरातील संपूर्ण भांडे, धान्य, कपडे, डाग, रोख रक्कम तसेच घरातील सर्व वस्तु जळुन खाक झाल्या होत्या. या जळीतामुळे स्वयंपाकासाठी व जेवणासाठी एकही भांडे राहिलेले नव्हते. तसेच धान्य, डाळी सर्व जळुन खाक झाले असून ठाकरे यांचा संसार कुटुंबासह उघड्यावर पडलेला होता.
यावेळी शिवसेना संघटक सर्जेराव सावंत, समन्वयक धिरजिसंग परदेशी, रावसाहेब नागरे, रमेश फरताळे, राहुल लोणारी, नाना भड, आबासाहेब जाधव, उत्तम घुले, विकास साताळकर, आशिष अनकाईकर, समाधान चव्हाण, लक्ष्मण घूगे, शंकरराव अलगट, अनिल अलगट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.