माजी विद्यार्थ्यांकडून नवीन वर्गखोलीसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:37 PM2020-03-06T14:37:35+5:302020-03-06T14:37:49+5:30
देशमाने शाळा : वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
देशमाने : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सन १९९८-९९ मध्ये ७ वी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षानंतर एकत्रित येत पुन्हा वर्ग भरवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेच्या नवीन वर्गखोलीसाठी २१ हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले.
स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक रतनगीर गोसावी होते. तब्बल वीस वर्षांनी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आल्याने वातावरण काहीसे भावनिक व आनंददायी झाले होते. बालपणीचा काळ सुखाचा म्हणत शाळेतील गमती जमती , शिक्षकांच्या आठविणीत सगळे दंग झाले. यावेळी वर्गशिक्षक विजय डेर्ले , सहशिक्षक काशिनाथ वाणी, प्रविण सावंत, सलीम मुजावर उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दुघड ,उपाध्यक्ष विनायक राठोड , मुख्याध्यापक पुंडलीक अनारसे , शितल सावंत , मिनाक्षी वाणी , भारती डेर्ले या शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख व एम्फथी फाउंडेशन मार्फत होऊ घातलेल्या शाळेच्या नूतन वास्तुसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी त्यासाठी २१ हजार रु पयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी आबा बनकर, पांडुरंग पवार, विनायक भालके , सुशील दुघड , गोरख शिंदे , रवींद्र जगताप, ज्ञानेश्वर गडाख , अरु ण पवार सर ,अनिता जाचक , शोभा बनकर , मीरा पानसरे , रोहिणी दहे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन शिवाजी औटी यांनी केले. यावेळी विनायक राठोड ,कैलास राठोड, विनायक भालके ,गोरख शिंदे, पांडूरंग पवार , रवींद्र जगताप, ज्ञानेश्वर गडाख, माधव शिंदे , किरण दुघड , गणपत जगताप, शिवाजी औटी, अविनाश बनकर, गणेश गांगुर्डे , पुंडलिक दुघड, सुशील दुघड, शितल गोसावी , मिरा सोनवणे, शिला तळेकर, लता गडाख, सविता शिंदे, हिराबाई शिंदे, मनीषा गोरे ,अनिता जाचक , शोभा शिंदे, स्वाती पवार, रोहिणी पवार, सरला पवार, सविता राठोड, शोभा बनकर, सारिका दुघड, गंगुबाई भवर, सुनीता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.