बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:19 PM2020-08-11T22:19:54+5:302020-08-12T00:05:52+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.

Helping the family of a dead woman in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबाला मदत

चिंचलखैरे येथे आगिवले यांच्या कुटुंबीयांना मदत देताना हिरामण खोसकर

Next
ठळक मुद्देसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरकरिता वीस कोटी रुपये मंजूर

घोटी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या भोराबाई आगिवले यांच्या कुटुंबीयांना आमदार हिरामण खोसकर यांनी पाड्यावर जाऊन १५ लाख रुपयांची मदत दिली.
विशेष म्हणजे शनिवारी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते. पिंजरा असलेला परिसर चुकवून पुन्हा बिबट्या रात्री पाड्यावर आल्याने आदिवासींमध्येभीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्या जेरबंद करावा अशा सूचना खोसकर यांनी केली. दरम्यान चिंचलेखैरे येथील परिसराची पाहणी करताना सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरकरिता वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खोसकर यांनी दिली. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, समीर साबळे, सरपंच मंगा खडके उपस्थित होते.

Web Title: Helping the family of a dead woman in a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.