शहिदांच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 11:22 PM2019-03-07T23:22:06+5:302019-03-07T23:25:52+5:30
चांदवड : संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी उभा राहिल्याने भारावून गेल्याच्या भावना बुलढाणा जिल्ह्यातील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. ते चांदवडकरांनी शहिदांसाठी उभारलेली मदत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत होते.
चांदवड : संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी उभा राहिल्याने भारावून गेल्याच्या भावना बुलढाणा जिल्ह्यातील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. ते चांदवडकरांनी शहिदांसाठी उभारलेली मदत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत होते.
यावेळी मालेगाव प्रांताधिकारी शर्मा, चांदवड तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना शहीद नितीन राठोड यांचे बंधू प्रवीण राठोड यांनी पुलवामा हल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी कसा उभा राहिला याचे थोडक्यात वर्णन केले. दरम्यानच्या काळात शिवजयंतीसारखा उत्सव असताना अनेक शिवप्रेमींनी जयंती साध्या पद्धतीने करत ती रक्कम प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे सुपूर्र्द केली. आठ दिवसांनंतर सर्व मदतपेट्या प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व पत्रकार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकोर्डिंगद्वारे उघडत ही रक्कम मोजण्यात आली. चांदवडकरांनी शहिदांसाठी दोन लाख २२ हजार इतकी रक्कम जमा केली होती. यातील १ लाख ११ हजार रुपये शहीद संजयसिंग राजपूत यांच्या मलकापूरगावी जात प्रांताधिकारी भंडारे यांनी स्वत: सुपूर्द केली, तर उर्वरित एक लाख ११ हजार रुपये शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांकडे चांदवड प्रांत कार्यालयात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी वीरपत्नी राठोड, दोन मुले, बंधू प्रवीण राठोड व चांदवडकर उपस्थित होते. दरम्यानतलाठी संघ व संपूर्ण महसूल कर्मचारी यांनी यावेळी ५० हजार रुपयांची ठोस मदत शहिदांच्या कुटुंबीयांकडे प्रदान केली.रात्रीतून मदत पेट्या तयार पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व दु:ख व्यक्त होत असताना प्रशासन व हेल्पिंग हँड्स ग्रुप चांदवड यांनी शहिदांसाठी चांदवडी मदत या शीर्षकाखाली चांदवडकरांना मदत उभारण्याचे आवाहन केले. यासाठी रात्रीतून मदत पेट्या तयार करून तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व सामाजिक संघटना यांना वितरित करण्यात आल्या.