गोदाकाठच्या पूरग्रस्त व्यावसायिकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:29+5:302021-09-23T04:16:29+5:30
निफाड/ चांदोरी : सन २०१९ वर्षी महापुरामुळे नुकसान झालेल्या चांदोरी, सायखेडा गावातील व्यावसायिकांना शासनाचा ...
निफाड/ चांदोरी : सन २०१९ वर्षी महापुरामुळे नुकसान झालेल्या चांदोरी, सायखेडा गावातील व्यावसायिकांना शासनाचा १ कोटी ६७ लाख नुकसान भरपाईचा निधी प्राप्त झाला आहे.
जुलै व ऑगस्ट सन २०१९ मध्ये निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाबरोबरच सुमारे ८३ गॅरेज/ उद्योग, ३८६ दुकानदार, टपरीधारक हातगाडीधारक यांचे नुकसान झाले होते. या शेतीमालाचे व व्यावसायिकाचे झालेल्या पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे ९ कोटी ६५ लाख इतकी रक्कम नुकसान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली, परंतु इतर व्यावसायिकाचे पंचनामे होईनाही नुकसान भरपाई मिळत नसल्याने आमदार दिलीपराव बनकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री छगनराव भुजबळ यांना प्रत्यक्ष भेट घेत व पत्रव्यवहार करत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली .
ही मागणी मान्य करत नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे ५ कोटी ४५ लाख इतका निधी प्राप्त झाला, असून यात निफाड तालुक्यात झालेल्या नुकसान भरपाईची सुमारे १ कोटी ६७ लाख इतकी रक्कम प्राप्त झाली असून लवकरच ती रक्कम संबंधित व्यावसायिकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती दिलीप बनकर यांनी दिली.
----------------------
सण २०१९ पासून चांदोरी येथील पूरग्रस्त व्यावसायिक शासन मदतीपासून वंचित होते. उशिरा का होईना आम्हा सर्व व्यावसायिकाना शासन मदत प्राप्त झाली आहे.
------- चेतन हिंगमिरे, व्यावसायिक
----------------------
सन २०१९ पुरात नुकसान झालेल्या गोदाकाठच्या व्यावसायिक शासन मदतीपासून वंचित होते. आमदार बनकर व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून जवळपास १ कोटी ६७ लक्ष रुपयांची शासन मदत प्राप्त झाली आहे.
--------- सिद्धार्थ वनारसे ( सदस्य जि.प. नाशिक) (२२ वनारसे) (२२ चांदोरी)
220921\22nsk_25_22092021_13.jpg~220921\22nsk_26_22092021_13.jpg
२२ चांदोरी इंम्पॅख्ट~२२ वनारसे