खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 06:25 PM2019-09-03T18:25:33+5:302019-09-03T18:25:58+5:30

कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील न्यायडोंगरी व परधाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे जमा करून व मदत फेरी काढून ६०,८७० रुपये जमा केले. सदर रकमेचा धनादेश तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Helping flood victims with food money | खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत

खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत

Next

नांदगाव : कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील न्यायडोंगरी व परधाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे जमा करून व मदत फेरी काढून ६०,८७० रुपये जमा केले. सदर रकमेचा धनादेश तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. लोकनेते कै. अ‍ॅड. विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक पल्लवी विलासराव आहेर, उपमुख्याध्यापक आर.के. सोनस, पर्यवेक्षक डब्ल्यू.ए. जाधव, मुख्य लिपिक बाळासाहेब भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवराम वेडूजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस विलासराव आहेर यांनी विद्यालयाने दिलेली मदत हा संवेदनांचा जागर असल्याचे म्हटले आहे. संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय परधाडी विद्यालयाने सक्रि य सहभाग घेतला.

Web Title: Helping flood victims with food money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.