नांदगावी पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:21+5:302021-09-12T04:17:21+5:30
गरिबाचे ओळखपत्र असलेले रेशन कार्डही वाहून गेले. त्या सर्वांना रेशनकार्ड देण्यासाठी तहसील कार्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ...
गरिबाचे ओळखपत्र असलेले रेशन कार्डही वाहून गेले. त्या सर्वांना रेशनकार्ड देण्यासाठी तहसील कार्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिलेल्या मदतीव्यतिरिक्त काहीही समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कांदे यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक चार्टर्ड अकौंटंट महावीर पारख,संतोष गुप्ता, विलास आहेर, नगराध्यक्ष राजेश कवडे, नगरसेवक किरण देवरे, आनंद कासलीवाल, प्रमोद भाबड, याकुब भाई, नितीन जाधव, सचिन साळवे, मनीषा काकळीज, कारभारी शिंदे, सुनील जाधव, भरत पारख, मुज्जू शेख उपस्थित होते.
----------------
आमचं तर आभाळंच फाटलं...
आमदारांकडून संसारोपयोगी वस्तू ताब्यात घेताना, समता मार्गावरची ६५ वर्षाची विधवा व तिची विधवा सून भिकूबाई चव्हाण हिला अत्यंत गहिवरून आले. ती म्हणाली की, आमचं तर आभाळ फाटलं. आमदारांच्या रूपाने देवदूत आला. देव त्यांच खूप खूप भलं करो. आम्हा गरिबांचे आशीर्वाद त्यांच्या मुलाबाळांना सुध्दा मिळो. भिकूबाई व तिची सून पती व मुलगा यांच्या मृत्युनंतर लोहार खिळे व इतर लोखंडी वस्तू तयार करतात. भिकूबाई सारखीच प्रतिक्रिया इतर महिलांनी व्यक्त केली.
---------------------
नांदगावी पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य वाटप करतांना आमदार सुहास कांदे व सौ. अंजुम कांदे. (११ नांदगाव कांदे)
110921\11nsk_8_11092021_13.jpg
११ नांदगाव कांदे