संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:14 PM2020-12-03T23:14:50+5:302020-12-04T01:03:54+5:30
नांदूरशिंगोटे : रंभा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे दमानी यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आगीत नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबाला किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
नांदूरशिंगोटे : रंभा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे दमानी यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील दापूर येथे आगीत नुकसान झालेल्या आदिवासी कुटुंबाला किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
दापूर येथील कमल सोमनाथ उघडे या आदिवासी कुटुंबाच्या घराला दोन दिवसांपूर्वी अचानक लागलेल्या आगीत घराचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने सदरचा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी कुटुंबाला गहू, तांदूळ, हरभरादाळ, साबण, चहा पावडर, साखर असे धान्य साहित्य किट देण्यात आले. यावेळी रंभा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य रवि वारुंगसे, अमोल चव्हाणके, रणजित पुजारी तसेच दापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, भगवान गारे, नवनाथ आव्हाड, नंदू काकड, बन्सी आव्हाड, सदाशिव आव्हाड आदी उपस्थित होते.