ऐन अडचणीत दिव्यांगांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:25 PM2020-05-13T22:25:57+5:302020-05-14T00:49:48+5:30

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना महापालिकेने दिव्यांगांना रोख रक्कम तसेच अन्नधान्य पुरवून मोठा आधार दिला आहे.

A helping hand to the disabled | ऐन अडचणीत दिव्यांगांना मदतीचा हात

ऐन अडचणीत दिव्यांगांना मदतीचा हात

googlenewsNext

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना महापालिकेने दिव्यांगांना रोख रक्कम तसेच अन्नधान्य पुरवून मोठा आधार दिला आहे. सुमारे २६ लाख
रुपयांचा लाभ देतानाच महापालिकेने विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ९५० दिव्यांग कुटुंबांना धान्य पुरवले आहे.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शहरातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. दिव्यांग व्यक्तींची तर अधिकच अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन दिली होती. शिवाय महापालिकेच्या समाज कल्याण खात्यामार्फतदेखील पात्र लाभार्थींना मदत करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने ६४० पात्र लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार तसेच अन्य योजनांच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या ३७ दिव्यांगांना मिळूून एकूण १९ लाख वीस हजार रुपये आरटीजीएसद्वारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
एकूण ९५० दिव्यांग कुटुंबांना धान्याचे किट घरपोच देण्यात आले आहे. ऐन संकटात दिव्यांगांना मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
---------------------------
बँक खात्यावर पैसे जमा
निराधार, विधवा, घटस्फोटित महिलांच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण शिष्यवृत्तीकरिता ६ लाख ६० हजार इतके अर्थसाह्य त्यांच्या बॅँक खात्यामार्फत आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले आहे. अनेक दिव्यांगांना अन्नधान्याची गरज असल्याने त्यांना शहरातील विविध एनजीओंच्या मदतीने धान्य पुरवण्यात आले.

Web Title: A helping hand to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक