मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:57+5:302021-06-16T04:18:57+5:30
परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे गावात एप्रिल व मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनही हादरले ...
परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे गावात एप्रिल व मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनही हादरले होते, तसेच एका कुटुंबातील पाच तर दुसऱ्या कुटुंबातील तीन जणांना आपला प्राण गमवावा लागल्याने, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील रेमा फाउंडेशने व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून निधी संकलित केला. प्रामुख्याने येथील मोठ्या प्रमाणात युवक नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, कल्याण, पुणे व नाशिक येथे आहे. त्यांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. येथील रेणुकामाता सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, आनंदराव शेळके, भाऊपाटील शेळके, शिवनाथ शेळके, जयराम शेळके, महेंद्र सानप, जनार्दन शेळके, भारत दराडे, कैलास बर्के, तात्याबा बरके यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे वितरण करण्यात आले. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून मदत निधी मिळावा, यासाठी रेमा फाउंडेशनच्या वतीने तलाठी एस.एस. जाधव यांना ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी रेमा फाउंडेशनचे अध्यक्ष बी.टी. शेळके, उपाध्यक्ष लक्ष्मण शेळके, सचिव जी.एम. बर्के, सचिन शेळके, दिनकर वाघचौरे, अंबादास साबळे, साहेबराव शेळके, बाळासाहेब आव्हाड आदीसह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
फोटो - १४ रेमा फाउंडेशन
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना रेमा फाउंडेशनच्या माध्यमातून किराणा साहित्य व आर्थिक मदत देण्यात आली.
===Photopath===
140621\14nsk_12_14062021_13.jpg
===Caption===
फोटो - १४ रेमा फाउण्डेशन सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना रेमा फाऊंडेशनच्या माध्यमातून किराणा साहित्य व आर्थिक मदत देण्यात आली.