सुरक्षारक्षकाच्या कुटुंबास मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:15+5:302021-07-28T04:14:15+5:30

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार म्हणून येवला येथील महावितरण कंपनी येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र रामदास ...

A helping hand to the family of the security guard | सुरक्षारक्षकाच्या कुटुंबास मदतीचा हात

सुरक्षारक्षकाच्या कुटुंबास मदतीचा हात

Next

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार म्हणून येवला येथील महावितरण कंपनी येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र रामदास ईप्पर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ईप्पर यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांचे सहकारी असलेल्या येवला येथील ३३/११ के.व्ही.वरील सुरक्षारक्षक समितीचे नाशिक जिल्हा समितीचे कर्मचारी व पदाधिका-यांनी एकत्रित येऊन ईप्पर यांच्या पत्नीला ४० हजार शंभर रुपयांची आर्थिक मदत देऊन कुटुंबाला आधार देण्याचा सामाजिक प्रयत्न केला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष राजेश गायकवाड, कॉ. बापूसाहेब जावळे, सचिव कॉ. एकनाथ झाडे, संघटक कॉ. राधाकिसन मुठाळ, उपाध्यक्ष कॉ. अतुल उबाळे, खजिनदार कॉ. सुनील मुठाळ, उपाध्यक्ष कॉ. मधुकर साठे, सल्लागार कॉ. अनिल सांगळे, कार्यकारी सदस्य कॉ. शांताराम वाघ व मनमाड डिव्हिजन अध्यक्ष काही सुरक्षारक्षक उपस्थित होते.

-----------------

येवला येथील महावितरण कंपनीचे सुरक्षारक्षक रवींद्र ईप्पर यांच्या पत्नी उषा ईप्पर व मुलगा रोहित यांच्याकडे आर्थिक मदत देताना कामगार समितीचे अध्यक्ष काॅम्रेड राजेश गायकवाड, बापूसाहेब जावळे, सचिव एकनाथ झाडे, राधाकिसन मुठाळ, अतुल उबाळे, सुनील मुठाळ, मधुकर साठे, अनिल सांगळे, शांताराम वाघ आदींसह कर्मचारी. (२६ नायगाव)

260721\244626nsk_36_26072021_13.jpg

२६ नायगाव

Web Title: A helping hand to the family of the security guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.