वंचितचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:46+5:302021-08-23T04:17:46+5:30

देवगाव : राज्यात कोल्हापूर, सांगली व कोकणासह अर्धा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे महापूर आले, यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. भूस्खलनाने ...

A helping hand to the flood victims! | वंचितचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.!

वंचितचा पूरग्रस्तांना मदतीचा हात.!

Next

देवगाव : राज्यात कोल्हापूर, सांगली व कोकणासह अर्धा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे महापूर आले, यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. भूस्खलनाने अनेकांचे संसार उदध्वस्त झाले असून डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले. घरातील अन्नधान्यांची नासाडी झाली. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मदत पोहोचविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतकार्यात त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन तालुक्यातील कार्यकर्ते यांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अन्नधान्याची मदत जमा करण्यात आलेली आहे.

रविवारी (दि. २२) नाशिक जिल्हाध्यक्षांकडे अन्नधान्य सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष तानाजी गांगुर्डे, मोहन सोनवणे, कृष्णा काशीद, संपत गांगुर्डे, हरीश तुपलोंढे, संपत चहाळे, अरुण शिंदे, श्याम कोथमिरे, योगेश रोकडे, अविनाश जाधव, अंकुश सोनवणे, अनिल गांगुर्डे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A helping hand to the flood victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.