मामको बँकेकडून सामान्य रुग्णालयाला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:17+5:302021-05-01T04:13:17+5:30
मालेगाव कॅम्प : येथील मालेगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सामान्य रुग्णालयात कोरोना उपचारासाठी लागणारे पीपीई किट, हात मोजे, सॅनिटायझर ...
मालेगाव कॅम्प : येथील मालेगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सामान्य रुग्णालयात कोरोना उपचारासाठी लागणारे पीपीई किट, हात मोजे, सॅनिटायझर आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.
ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे साहित्य सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेश महाले, डॉ. संदीप खैरनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी राजेंद्र भोसले यांनी सांगितले, सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक यांना जीव मुठीत घेऊन कामे करावी लागत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत बँकेच्या माध्यमातून हा मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी सामान्य रुग्णालयाचे शरद पाथरे, वाहनचालक मुक्तार अहमद, नाना शिरसाट, सद्दाम शेख, अर्चना वाघ तसेच मामको बँकेचे महाव्यवस्थापक कैलास जगताप, संचालक गौतम शहा, विठ्ठल बागुल, भिका कोतकर, चंदूबापू बच्छाव, छगन बागुल, अधिकारी संजय अहिरे उपस्थित होते.
इन्फो
कोट....
सामान्य रुग्णालयात सध्या शंभरहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. वेळोवेळी साहित्य कमी पडते. रुग्णालय व्यवस्थापनाचे याकडे लक्ष असते, तरीही काही वेळी अडचण येते. मामको बँकेने दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे.
-डॉ. संदीप खैरनार
फोटो- ३० मामको बँक
मालेगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सामान्य रुग्णालयात पीपीई किट्ससह इतर साहित्य देताना बँकेचे ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले. समवेत व्यवस्थापक कैलास जगताप, संचालक गौतम शहा, विठ्ठल बागुल, भिका कोतकर, चंदू बच्छाव, छगन बागुलसह डॉ. हितेश महाले, डॉ. संदीप खैरनार आदी.
===Photopath===
300421\30nsk_18_30042021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० मामको बँक मालेगाव मर्चंट को.ऑपरेटिव्ह बँकेच्यावतीने सामान्य रूग्णालयात पीपीई किट सह इतर साहित्य देतांना बँकेचे जेष्ठ संचालक राजेंद्र भोसले. समवेत व्यवस्थापक कैलास जगताप, संचालक गौतम शहा, विठ्ठल बागूल, भिका क़ोतकर,चंदू बच्छाव, छगन बागूल सह डॉ. हितेश महाले, डॉ. संदीप खैरनार आदी.