महाराजा फाउण्डेशनकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 11:57 PM2020-04-03T23:57:15+5:302020-04-03T23:57:43+5:30

लॉकडाउनमुळे कळवण शहरात परराज्य व पर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबे अडकून पडली आहेत. रोजगार नसल्याने १५० कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. कळवणच्या महाराजा युवा फाउण्डेशनकडून त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

A helping hand from the Maharaja Foundation | महाराजा फाउण्डेशनकडून मदतीचा हात

कळवण शहरातील गरजू कुटुंबीयांना महाराजा युवा फाउण्डेशनच्या वतीने जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यापं्रसंगी आमदार नितीन पवार, सचिन माने, सुनील शिरोरे, धनंजय पवार, भूषण पगार, रोहित पगार राजेंद्र पगार, जयेश पगार, सुनील देवरे आदी.

Next
ठळक मुद्देकळवण : १५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात परराज्य व पर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबे अडकून पडली आहेत. रोजगार नसल्याने १५० कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. कळवणच्या महाराजा युवा फाउण्डेशनकडून त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १५० मजुरांच्या कुटुंबांना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तू कळवण नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सचिन माने यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार प्रणीत महाराजा युवा फाउण्डेशनने किराणा माल व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कळवण शहरातील व तालुक्यातील सामाजिक संस्थांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले. फाउण्डेशनचे अध्यक्ष रोहित पगार, राजेंद्र पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कमकोचे माजी अध्यक्ष सुनील शिरोरे, भूषण पगार, नितीन वालखडे, विलास शिरोरे, रोहित पगार, राजेंद्र पगार,जयेश पगार, सुनील देवरे, मोहनलाल संचेती, प्रकाश संचेती, जयंत देवघरे, बाळासाहेब जाधव योगेश पगार आदी उपस्थित होते.

Web Title: A helping hand from the Maharaja Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.