सातासमुद्रापलीकडून मानूर केंद्राला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:23+5:302021-05-07T04:15:23+5:30
मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ...
मानूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर मानूर येथील कृष्णाजी कान्हूजी पवार सार्वजनिक वाचनालयचे उपाध्यक्ष डॉ. समीर पवार यांनी आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना मानूर कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरसह आवश्यक साधनसामुग्रीची मदत करावी, असे आवाहन केले होते.
डॉ. पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अमेरिका येथे स्थायिक असलेले डॉ. भुगू पांगे व लंडन येथे स्थायिक झालेले डॉ. अभिमन्यू कोहक यांनी प्रत्येकी ५ असे १० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मानूर कोविड सेंटरला भेट दिले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे हे सिलिंडर सुपुर्द करण्यात आले.
डॉ. समीर पवार मित्रमंडळाचे सदस्य प्रसाद कोथमिरे यांनी कळवण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर, एन ९५ मास्क दिले असून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे ते सुपुर्द करण्यात आले.
यावेळी मधुकर पवार,नितीन पवार, बबन पवार, दिनेश पवार, मुन्ना पवार, निलेश बोरसे, शेखर पवार, तुषार बोरसे, गोपी बोरसे, मनोज पवार आदी उपस्थित होते.
फोटो - ०६ मानूर कोविड
मानूर कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सुपुर्द करताना सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना समवेत मधुकर पवार, नितीन पवार, बबन पवार, दिनेश पवार, मुन्ना पवार, निलेश बोरसे, शेखर पवार, तुषार बोरसे, गोपी बोरसे, मनोज पवार उपस्थित होते.
===Photopath===
060521\06nsk_16_06052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०६ मानूर कोविड मानूर कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलेंडर सुपूर्द करतांना सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना समवेत मधुकर पवार, नितीन पवार, बबन पवार, दिनेश पवार, मुन्ना पवार, निलेश बोरसे, शेखर पवार, तुषार बोरसे, गोपी बोरसे, मनोज पवार.