उघड्यावर संसार थाटलेल्या गरजूंना मदतीचा हात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:03 PM2020-05-06T18:03:44+5:302020-05-06T18:03:52+5:30
पेठ - गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळासह पायपीट करूनही कोरोनाच्या भितीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजूरांना अखेर गावाबाहेरच्या ऊघड्यावर आपला संसार थाटावा लागला. मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुंटूंबांना यशोदिप सामाजिक संस्थेने जीवनावश्यक साहित्य पोहच करून मदतीचा हात पुढे केला.
पेठ - गाव घराच्या ओढीने शेकडो किलोमीटर मुलाबाळासह पायपीट करूनही कोरोनाच्या भितीने गावात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी मजूरांना अखेर गावाबाहेरच्या ऊघड्यावर आपला संसार थाटावा लागला. मात्र सोबतचा शिधा व पैसेही संपलेल्या या गरजू कुंटूंबांना यशोदिप सामाजिक संस्थेने जीवनावश्यक साहित्य पोहच करून मदतीचा हात पुढे केला.
आदिवासी भागातून रोजगारानिमित्त पर जिल्हयात स्थलांतरीत झालेले शेतमजूर कोरोनामुळे गावाकडे परतत असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शेकडो मैल पायपीट करत मजूर गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांमूळे गावात कोरोनाचा शिरकाव होईल या भितीने अनेक गावांमध्ये अशा मजूरांना प्रवेश नाकारला जात असल्याची वस्तू स्थिती पहावयास मिळत आहे.कामाचे ठिकाण व गाव दोन्ही पासून दुरावल्याने अनेक कुटूंबांना गावकुसावर ऊघडयावर संसार थाटावा लागत असून वाढत्या लॉक डाऊनमुळे जवळचा शिधा व पैसेही संपत आल्याने अशा कुटूंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पेठ शहरानिजक अशाच प्रकारच्या स्थलांतरीत कुंटूबांची माहीती मिळाल्यानंतर यशोदिपचे अध्यक्ष गिरीश गावीत व सहकार्यांनी या नागरिकांना किराणा साहित्य वाटप केले.
----------------------------
कविता राऊत यांनी दिला धिर
सावरपाडा एक्सप्रेस धावपटू कविता राऊत यांनी पेठ तालुक्यातील फणसपाडा , माळेगाव ,आसदणपाडा या गावात यशोदिपच्या माध्यमातून गरजूंना धान्य वाटप करून नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटाशी सामना करतांना काळजी घ्या असा धीर त्यांनी दिला. आदिवासी कवी देवदत्त चौधरी यांनी कोरोना जनजागृती कविता सादर केल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल भडांगे , अध्यक्ष गिरीष गावित,इंजि. महेश तुंगार, यशोदिप चे सदस्य गुलाब चौधरी, दिपक हलकंदर ,सुरेश धूम,राजेश भोये, मुरलीधर चौधरी,मनोहर राऊत ,हेमराज मानभाव, हेमंत सातपुते ,नितीन भोये ग्रामसेवक भारती देशमुख, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.