पेठ तालुक्यात गरजूंना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:10 PM2020-05-08T22:10:14+5:302020-05-08T23:59:14+5:30
पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
पेठ तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरातच्या सरहद्दीवर वसलेला पिठुंदी एक छोटासा पाडा. या पाड्यावर शैक्षणिक कामात मदत करणारी एज्युकॉइन फाउंडेशन नाशिक या संस्थेने कोरोना संकटात अडकलेल्या ६४ कुटुंबांना जीवनावश्यक
किराणा साहित्य व गरोदर/स्तनदा मातांना पौष्टिक आहाराचे २० किट वाटप केले. पिठुंदी येथील
लोकांचा व्यवसाय शेतमजुरीचा
आहे. सध्या रोजगार बंद असल्याने अशावेळी एज्युकॉइन फाउंडेशनने गावकऱ्यांंना मदतीचा हातभार लावला आहे.
यावेळी भाऊसाहेब बावा यांनी कोरोनाशी कसे लढावे याची माहिती दिली. याप्रसंगी भरत सोळंकी, निखिल ढगे, नागेश कोठुळे, प्रीतम कोठुळे, गणेश पगार, रविंदरसिंग, मुख्याध्यापक भाऊसाहेब बावा आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय संशोधन संघ व एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने कुंभाळे येथे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी यशोदा राऊत, संजय भोये, स्वामी आदी उपस्थित होते.