‘वनप्रस्थ’च्या वृक्ष संवर्धनासाठी ‘प्रगती’कडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:34+5:302021-07-14T04:17:34+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्रगण्य कृषी साहित्य उत्पादक कंपनी प्रगती इंडस्ट्रीज व प्रगती अॅग्रोटेक यांच्या वतीने वनप्रस्थ फाउंडेशनला वृक्ष ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्रगण्य कृषी साहित्य उत्पादक कंपनी प्रगती इंडस्ट्रीज व प्रगती अॅग्रोटेक यांच्या वतीने वनप्रस्थ फाउंडेशनला वृक्ष संवर्धनासाठी ५० हजार रुपये किमतीचे ठिबक सिंचन नळी व आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. कारखान्याचे संचालक नंदकुमार पाटील व ज्ञानेश्वर गवते यांच्या हस्ते नुकतेच हे साहित्य वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक दत्तात्रय बोऱ्हाडे, राजाभाऊ क्षत्रिय, डॉ. महावीर खिवंसरा, अनिल जाधव, अभिजित देशमुख यांच्याकडे प्रदान करण्यात आले.
पावसाने ओढ दिल्याने वनप्रस्थ फाउंडेशनला ऐन पावसाळ्यात वृक्षलागवड केलेल्या रोपांना नळीच्या साहाय्याने पाणी पुरवठा करावा लागत होता. कंपनीचे संचालक नंदकुमार पाटील यांना ही माहिती कळताच त्यांनी संस्थेचे स्वयंसेवक दत्तात्रय बोऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधून सदरच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेले ठिबक नळ्यांचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १० बंडल व इतर साहित्य संस्थेच्या स्वयंसेवकांच्या ताब्यात दिले. तसेच यापुढे देखील या प्रकारच्या साहित्याची आवश्यकता असल्यास सहकार्य करण्याची तयारीदेखील पाटील यांनी दर्शविली. पाटील यांच्या सहकार्याने वनप्रस्थ फाउंडेशनच्या या उपक्रमास नवी ऊर्जा मिळाली आहे.
फोटो -१२ सिन्नर हेल्प
सिन्नर येथील वनप्रस्थ फाउंडेशनला वृृक्ष संवर्धनासाठी ५० हजार रुपयांचे ठिबकचे साहित्य सुपूर्द करताना माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नंदकुमार पाटील व ज्ञानेश्वर गवते.
120721\12nsk_37_12072021_13.jpg
सिन्नर येथील वनप्रस्थ फाऊंडेशला वृृक्ष संवर्धनासाठी ५० हजार रुपयांचे ठिबकचे साहित्य सुपूर्द करतांना माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नंदकुमार पाटील व ज्ञानेश्वर गवते.