आदिवासी बांधवांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:41+5:302021-04-01T04:15:41+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कावळ्याचा पाडा येथे नाशिकच्या ग्रीन केअर संस्थेतर्फे ५६ गरजू आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या किराणा ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कावळ्याचा पाडा येथे नाशिकच्या ग्रीन केअर संस्थेतर्फे ५६ गरजू आदिवासी कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या किराणा संचाचे वाटप करण्यात आले. जि.प. प्राथमिक शाळेतील ३१ विद्यार्थ्यांना यावेळी खाऊ, पेन्सिल व मास्क देण्यात आले.
कावळ्याचा पाडा येथे एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. पण गावातले अनेक जण रोजगारासाठी गिरणारे, नाशिक या परिसरात दररोज येतात. अलीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेचसे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना पुरेसे काम मिळत नाही. परिणामी दररोजच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा वेळी मदतीचा हात म्हणून पाड्यावरील प्रत्येक कुटुंबाला किराणा वाटप करण्यात आले. त्यात तेल, मूगडाळ, गूळ, मीठ, काडेपेटी, अंगाचा व कपडे धुण्याचा साबण यांचा अंतर्भाव करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रीन केअर संस्थेच्या अध्यक्षा पौर्णिमा आठवले, सलीम शेख, चित्रकार बाळ नगरकर, डॉ. दिव्या सातले, संजय देवधर यांच्यासह मुख्याध्यापक भास्कर वाघेरे, सुरेश सूर्यवंशी, नरहरी बेंडकोळी, पुंडलिक बेंडकोळी, तसेच ग्रामस्थ व महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.