वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:52 PM2018-06-27T22:52:42+5:302018-06-27T22:52:49+5:30

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे येथे गेल्या आठवड्यात वीज पडून मयत झालेल्या तरुण शेतकºयाच्या वारसाला शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतून ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.

 Helping the legatee of the deceased farmer | वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत

वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत

Next
ठळक मुद्देशासनाकडून नैसर्गिक आपत्तीतून ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे येथे गेल्या आठवड्यात वीज पडून मयत झालेल्या तरुण शेतकºयाच्या वारसाला शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतून ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे येथील तरुण शेतकरी प्रवीण गणपत कासार (३०) याच्या अंगावर वीज पडून त्यांचा १९ जून रोजी मृत्यू झाला होता. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. मयत शेतकरी प्रवीण यांच्या पत्नी कविता कासार यांच्या नावाने ४ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्राप्त झाला.
तहसीलदार नितीन गवळी यांच्यावतीने वावीचे मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी यांनी कासार यांच्या वारसाला सदर मदतीचा धनादेश प्रदान केला.
यावेळी तलाठी गणेश कदम, पोलीस पाटील राजेंद्र कासार, बाबासाहेब कांदळकर, संतोष पगार, बाळासाहेब साळुंके यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Helping the legatee of the deceased farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.