वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून मदतीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:13 AM2019-06-12T00:13:45+5:302019-06-12T00:14:24+5:30
वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
नाशिकरोड : वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
जेलरोड येथील कुलथे मंगल कार्यालयात नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी सानप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे वितरण व्यवस्थापक दुष्यंत पाराशर यांच्यासह हेमंत वाल्हे, स्वाती दुर्वे, अभिजित गरूड, संजय जोरे, आर. आर. पाटील, प्रसाद क्षत्रिय, अभिषेक तिवारी, संजय मुंडलिक, विशाल जमधडे, ओंकार कानडे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष महेश कुलथे, सचिव भारत माळवे, खजिनदार वसंत घोडे, कार्याध्यक्ष गौतम सोनवणे, सुनील जाधव, हर्षल ठोसर, उल्हास कुलथे, मनोहर खोले, अनिल कुलथे, योगेश भट, संदीप परसे, किशोर सोनवणे, राजेंद्र शिंदे, उत्तम गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ११० पाल्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच लकी ड्रॉ द्वारे सहा पैठणींचेही वाटप करण्यात आले. स्वच्छता दूत म्हणून ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते ईस्माईल पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी केले. सूत्रसंचलन महेश कुलथे व आभार भारत माळवे यांनी मानले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.