हेल्पलाईन नंबरवर केवळ लसीकरणासाठी फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:21+5:302021-06-24T04:11:21+5:30

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर गेल्या दोन महिन्यांपासून केवळ लसीकरणाबाबत फोन येत आहेत. लस ...

Helpline number for vaccination only | हेल्पलाईन नंबरवर केवळ लसीकरणासाठी फोन

हेल्पलाईन नंबरवर केवळ लसीकरणासाठी फोन

Next

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर गेल्या दोन महिन्यांपासून केवळ लसीकरणाबाबत फोन येत आहेत. लस कुठे मिळेल, कधी मिळेल , त्रास झाला तर कोणत्या गोळ्या घेऊ असे नागरिकांचे फोन येत आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वॉर रूम तयार केली होती. महापालिकेच्या जुन्या इमारतीत उभारलेल्या वॉररूममध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटांच्यावेळी नागरिकांनी फोन करून माहिती घेतली. त्यामुळे वॉररूमचा नागरिकांना तसा फायदाच झाला यामुळे लोकांना बेड शिल्लक आहे का, कोणत्या रुग्णालयात जायचे, रेमडेसिविर आहे का, अशा प्रकारची चौकशी नागरिकांनी करून माहिती घेतली त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी मनपाच्या स्वतंत्र कक्षाला वॉररूमला असंख्य फोन आले त्या तुलनेत दुसऱ्या लाटेेच्या वेळी कमी फोन आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्या मे महिन्यापासून दुसरी लाट ओसरल्याने कोरोनाची रुग्णसंख्याही घटली असून त्यामुळे नागरिकांचे फोन येणे जवळपास बंद झाले आहे. मे महिन्यात सात ते आठ जणांनी कॉल केले. जूनमध्ये चार ते पाच जणांनी फोन केले.

---------------------------

पहिल्या लाटेनंतर आलेले एकूण कॉल्स-३१४

--------------------

दुसऱ्या लाटेत आलेले एकूण कॉल्स-१९९

१मे --१४

१५ मे- १०

१जून-५

१५ जून-३

२० जून-२

-----------------------------

मालेगाव शहरातील उपचारासाठी येणाऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागातून जास्त कॉल्स आले. त्यात त्यांच्या राहण्याची व्यवस्था मसगा महाविद्यालयातील सामान्य रुग्णालयात की सहारा हॉस्पिटलमध्ये जाऊ असे कॉल्स हाेते. शहर तालुक्याखेरीज नाशिक व्यतिरिक्त बाहेरगावच्या लोकांनी देखील फोन करून बेड शिल्लक आहे का म्हणून चौकशी केली. मालेगावच्या वॉररूममधील फोनवर जास्त फोन आता लसीकरणाबाबत येत असून त्यात १८ वर्षांवरील मुलांना लस कधी मिळेल. आम्ही पहिला डोस घेतला आहे आता दुसरा डोस कधी मिळेल म्हणून विचारणा करण्यात येत आहे.

===Photopath===

230621\23nsk_17_23062021_13.jpg

===Caption===

हेड

Web Title: Helpline number for vaccination only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.